जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरून परिसरात जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी घडला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरून परिसरात संशयित आरोपी दादू याने जुन्या वादातून एकावर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या, पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. परंतू तोपर्यंत संशयित पसार झाला होता. गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला?, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.