जळगाव (प्रतिनिधी) श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती निमित्त बहुउउद्यशिय संस्थातर्फे कालिंका माता मंदिर जवळ श्री.संताजी महाराज यांच्या मंदिरात सर्व समाज बांधव व भगिनींनी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जयंती साजरी केली. यावेळी उपमहापौर सुनील खडके उपस्थित होते.
डी. ओ. चौधरी यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. दीपक चौधरी, डॉ. सुषमा चौधरी यांनी कोरोना काळात कामगिरी केली म्हणून त्यांचा सुध्दा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.