TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जानेवारी २०२५ मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद !

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा संविधान सन्मान परिषद राज्य समन्वय समितीचे प्रमुख तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांनी आज एरंडोल येथे झालेल्या नियोजन सभेत केली. या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेला संविधान जागर चळवळीमध्ये योगदान देणारे संविधान अभ्यासक, प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार व समाज सुधारक यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान जागर चळवळीत काम करणाऱ्या राज्यभरातील ७५ कार्यकर्त्यांना, लेखक तसेच विचारवंतांना ‘संविधान योद्धा’ म्हणून गौरवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या ७५ संविधान योद्धांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. या सोबतच संविधानावर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. ‘घर घर संविधान’ या अभियानाचा एक भाग म्हणून संविधान परिषदेला उपस्थित सर्वच संविधान प्रेमींना संविधानाची पुस्तिका भेट म्हणून दिली जाणार आहे. भारतीय संविधानावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून पारितोषिक प्राप्त उत्कृष्ट निबंधांची पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. संविधान परिषदेनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याची माहिती भरत शिरसाठ यांनी दिली.

संविधान सन्मान परिषदेच्या नियोजनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील जिल्हा पश्चिम विभागाची पहिली सभा आज रोजी एरंडोल येथील हिमालय कॉम्प्लेक्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. समता शिक्षक परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. भरत शिरसाठ यांनी विविध समित्यांची रचना व त्यांचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट केले. सभेचे प्रास्ताविक भैय्यासाहेब सोनवणे सर यांनी केले. सत्यशोधक चळवळीचे पी.डी. पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, डॉ.संदीप कोतकर, भारतीय बौद्ध महासभेच्या पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई सोनवणे, पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता साळुंखे, प्रकाश तामस्वरे सर, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, साप्ताहिक लेखन मंचचे संपादक अजय भामरे,पत्रकार बापूराव ठाकरे सर, पत्रकार व लेखक सोपान भवरे सर, त्यागमूर्ती माता रमाई पुस्तकाच्या लेखिका वर्षा शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे, प्रतीक्षा सोनवणे, धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राजेंद्र वाघ आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व परिषदे संदर्भातील अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये रणजीत सोनवणे यांनी संविधान सन्मान परिषद यशस्वी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

जळगाव जिल्हा पश्चिम विभागाच्या संयोजन समिती प्रमुख पदी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राजेंद्र वाघ यांची निवड करण्यात आली. धरणगाव तालुका संयोजन समिती प्रमुखपदी पी डी पाटील सर व लक्ष्मण पाटील सर, धरणगाव तालुका महिला संयोजन समिती प्रमुखपदी सविता गाडे व उषाताई बाविस्कर, अमळनेर तालुका संयोजन समिती प्रमुखपदी बापूराव ठाकरे तसेच अंमळनेर तालुका महिला विभाग संयोजन समिती प्रमुखपदी मंगलाताई सोनवणे व प्रमिलाताई ब्रह्मे, पाचोरा तालुका संयोजन समिती प्रमुखपदी संगीताताई साळुंखे, एरंडोल तालुका संयोजन समिती प्रमुख पदी प्राध्यापक नरेंद्र गायकवाड व एरंडोल तालुका महिला संयोजन समिती प्रमुखपदी सुलोचना खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. एरंडोल तालुका अल्पसंख्यांक विभाग संयोजन समिती प्रमुखपदी कादर पिंजारी यांची तर एरंडोल शहर युवा संयोजन समिती प्रमुखपदी कविराज पाटील यांची निवड करण्यात आली.

सभेप्रसंगी डॉ. नरेंद्र तायडे, भारती ठाकरे मॅडम, चिंतामण जाधव सर, प्राध्यापक उमेश सूर्यवंशी, मुख्याध्यापक प्रवीण केदार सर, मुख्याध्यापक सुधाकर मोरे सर, मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे सर, एरंडोल आगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी भगवान ब्रह्मे, बाबुराव भगत, एरंडोल आगाराचे कर्मचारी सुनील खैरनार, प्रा.आकाश बिवाल, मयूर भामरे, सतिश शिंदे सर, वंचित बहुजन आघाडी अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मीक सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस प्रमिलाताई ब्रह्मे, संघटक नलिनीताई, पंचशीला संदानशिव, जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता अजय घोलप, शंकर शिरसाठ, कादर पिजारी, सागर बोरसे, जगदीश पवार, उषाबाई विजय बाविस्कर, सविता प्रमोद गाडे, मनीषा जाधव, प्रमिला तामस्वरे, वर्षा शिरसाठ, सुमनताई बिऱ्हाडे, वर्षा कोतकर, सुलोचना खोब्रागडे, प्रज्ञा हातोले, अरुणा शिरसाठ, कविता ब्राह्मणे, जयश्री अमृतसागर, ज्योती रामोशी, सुवर्णा शिरसाठ, डाॅ. भूषण जाधव, विजया जाधव, करुणा सोनवणे, शांताराम साळुंखे, निशांत खोब्रागडे, रामू सोनवणे, इब्राहीम पिंजारी इत्यादी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक वृंद एरंडोल, पाचोरा, अंमळनेर, चाळीसगाव, पारोळा, धरणगाव व चोपडा तालुक्यातून उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, ११७६ झाले बरे !

April 9, 2021

विजय वाघमारेंनी तक्रार करताच झाली बदली ; गोटेंनी काढली फडणवीसांची दोन प्रकरणं बाहेर !

March 9, 2022

पाचोरा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या !

September 24, 2020

श्रीमती शरदचंद्रीका पाटील तंत्रनिकेतन कॉलेजच्या अकाऊटंटने केला लाखोंचा अपहार !

December 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group