पिंप्री खुर्द ता . धरणगाव (प्रतिनीधी) गावातील विविध अडचणी लक्षात घेता १५वित्त आयोगातून बाजार पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. मंगळवार हा बाजाराचा दिवस असून बाजारात मोठ्या प्रमाणातभाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने येथे लागतात. परंतु बाजार पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने दुकानदार हे रोडावर येऊन बसायचे व त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण व्हायचा. या सर्व गोष्टींची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने बजार पट्ट्यात काँक्रिटी करण्यासाठी पंधरा वित्त आयोगातून निधी मंजूर करून चाळीस ब्रास काम हे करण्याचे ठरविले. या अनुषंगाने आज ग्रामपंचायत प्रशासनातर्फे बजार पट्ट्या परिसरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या कामाची पाहणी पिंप्री येथील महिला सरपंच संसारलाबाई बडगुजर तसेच ग्रामपंचायत सदस्य सरलाबाई लोखंडे यांनी पाहणी केली. काम सुरू असल्याचे पाहून परिसरातून तसेच नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. विशेष करून महिला वर्गातूनमोठ्या प्रमाणात या कामाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.