जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २४३ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून २११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर – ८४ , जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-२५, अमळनेर-१५, चोपडा-०५, पाचोरा-०१, भडगाव-०६, धरणगाव-०१, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०३, रावेर-०३, पारोळा-०१, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-२०,बोदवड-०२ आणि अन्य जिल्हा ०५ असे एकुण २११ रूग्ण आज आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५१,हजार २१३ रूग्ण आढळून आले असून ४७,हजार ३९६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज०४ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात रूग्णांची मृत्यूचा आकडा १२३० वर पोहचला आहे.