नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. आज ४० हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या २४ तासांत ४३,६५४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ६४० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४१,६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासात ४१ हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २२ हजार ०२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
४४ कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २७ जुलैपर्यंत देशभरात ४४ कोटी ६१ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ४० लाख २ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४६ कोटी ९ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १७.३६ लाख कोरोनाचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ६ हजार २५८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख ५८ हजार ७५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५४ टक्के आहे. राज्यात काल २५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१ टक्के झाला आहे.