जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिंग रोड यशवंत कॉलनीतील तरुणीची दिवाळी ऑफर्समध्ये आवश्यक साहित्याची ऑर्डर देण्याच्या नावाखाली तब्बल २९ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दिशा अनिल अग्रवाल (वय २९) रिंग रोड यशवंत कॉलनीत वास्तव्याला आहेत. दिशाने ऑनलाइन पद्धतीने दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू ऑर्डरनुसार मागविल्या होत्या. ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करूनही कोणत्याही वस्तू आल्या नाहीत. यासाठी साक्षी सिंग आणि पीयूष जैन (रा. उदयपूर, राजस्थान) यांनी तरुणीचा विश्वास संपादन करून फोन-पे मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून २९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. तरुणीने शनिवारी (ता. १) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार असून, दुपारी दोनला साक्षी सिंग आणि पीयूष जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम वागळे हे तपास करीत आहेत.