जळगाव (प्रतिनिधी) क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याच्या नावाखाली जळगावात एकाला ३४ हजारांत गंडवले ! क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याच्या नावाखाली शिरसोली येथील भगवान सुपडू सोनार या तरुणाची ३४ हजार ६८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील भगवान सुपडू सोनार दि.१० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करून आरबीएल क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर मोबाइलवर ओटीपी पाठवून सोनार यांच्या खात्यातील ३४ हजार ६८० रुपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सोनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार जितेंद्र राठोड हे करीत आहेत.