पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील एका ५० वर्षीय डॉक्टरची ५१ हजार फसवून केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील बाहेरपुरा येथील डॉक्टर असलेले राजेंद्र काशिनाथ चौधरी (वय ५०) यांनी शहरालगत असलेल्या एका बखळ प्लॉटची सौदे पावती डॉ.चौधरी यांनी ५१ हजारात केली होती. त्यानंतर सौदे पावतीची मुदत असताना संशयित आरोपी प्रतिभा संजय बोडखे व माधव पायघन यांनी परस्पर राहुल पवार यांनी विक्री करून डॉ.चौधरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुल मोरे हे करीत आहेत.