जळगाव (प्रतिनिधी) आज महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या मतदानाचा मतमोजणी झाल्यानंतर आलेल्या निकाला मधून सहा जागांपैकी चार जागांवरती महा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवित विजय मिळालेला आहे.
विधान परिषदेच्या निकालाचा जल्लोष करण्यासाठी व सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी जळगाव शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एन. एस. यु. आय. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हातून फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा वर्षानुवर्षे ही भाजप पक्षाकडे असताना नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असताना तेथील मतदारांनी मात्र महा विकास आघाडी च्या उमेदवारावर विश्वास दाखवत नागपूर मतदारसंघातून भाजपाला हद्दपार केले. महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेचे व मतदारांचे जळगाव शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खूप खूप आभार व त्यांनी दाखवलेल्या महाविकास आघाडी सरकारवरील विश्वास पुढील भविष्यात सर्वांना काम करण्यासाठी प्रेरक राहील असा विश्वास जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बोलतांना व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष मनोज सोनवणे, अनुसूचित जाती जमाती महानगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष उद्धव वाणी, सरचिटणीस सुरेंद्र कोल्हे, दीपक सोनवणे, विष्णू घोडेस्वार, पी. जी. पाटील, शशी तायडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील
1. पुणे पदवीधर मतदार संघामधून महा विकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड
2. पुणे शिक्षक मतदार संघातून महा विकास आघाडीचे जयंत आसलगाव कर
3. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महा विकास आघाडीचे सतीश चव्हाण
4. नागपूर पदवीधर मतदार संघातून महा विकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना मतदारांनी मोठ्या बहुमताने विजय केले व संपूर्णपणे भाजपाला हद्दपार करण्यात आले.