पिंप्री खु. ता. धरणगाव (प्रतिनिधी) : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे नवीन इमारतीत सोमवार दि. 10 रोजी जळगांव रोड कमल नगर येथे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बँकेच्या उद्घाटन प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख जळगाव रमणामूर्ती यांच्या हस्ते ठेवण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव तहसील येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले तसेच प्रणव कुमार झा. एल डी एम जळगाव हे आहेत. विशेष म्हणजे या बँकेत मॅनेजर, कॅशियर, क्लार्क, कृषी सखी हे सर्व महिला कर्मचारी असून ही बँक महिला बँक म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण करण्याचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे धोरण आहे. तरी सेंट्रल बँक शाखेच्या ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या मॅनेजर सौ. रश्मी समल यांनी केले आहे.