जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण विकास मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत मौजे रायपूर या गावातील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरच्या कामाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दि. 24 जुलै रोजी लोकार्पण करण्यात आले. तसेच वॉर्ड क्रमांक 2 च्या फलकाचे लोकार्पण ज्येष्ठ शिवसैनिक सिताराम मोहन परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
मौजे रायपूर या गावातील वार्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 3 मधील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी उपतालुकाप्रमुख प्रवीण परदेशी यांच्यासह गावातील नागरिकांनी जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. प्रतापराव पाटील यांनी दखल घेत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईत मौजे रायपूर गावातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला. आणि गावातील रस्ते तयार करण्यासाठी निधी मंजूर करून दिला होता. मौजे रायपूर या गावातील वार्ड क्रमांक 1 साठी दहा लाखांचा निधी तर वार्ड क्रमांक 3 साठी पाच लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. मौजे रायपूर गावातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेल्या वार्ड क्रमांक 1 च्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते आणि वॉर्ड क्रमांक 3 च्या फलकाचे सिताराम परदेशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपतालुकाप्रमुख जितेंद्र पाटील, उपतालुकाप्रमुख प्रवीण परदेशी, जितू पाटील, अनिल भोळे, मानसिंग परदेशी, राजेंद्र परदेशी, दीपक पाटील, नितीन सपकाळे, प्रकाश परदेशी, सुरेश परदेशी यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.