धरणगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या हस्ते शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, रमेश पाटील, प्रेमराज पाटील, संभाजी चव्हाण, भगवान पाटील, सुदाम पाटील, दूध फेडरेशनचे दगडू चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादीचे अरविंद मानकरी, दीपक जाधव, संभाजी कंखरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी एरंडोल, धरणगाव तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन नीळकंठ पाटील, व्हाइस चेअरमन संजय जाधव, संचालक गोकुळसिंग पाटील, रमेश पाटील, प्रभाकर ठाकूर, विजय महाजन, रमेश अत्तरदे, डॉ. सतीश देवकर, अशोक भांडारकर, शरद पाटील, दीपक वाणी तसेच शेतकरी संघाचे ट्रेडर्स देविदास पाटील, मॅनेजर अरुण पाटील व कर्मचारी सागर पाटील, उमेश चौधरी, जगदीश पाटील, सचिव नवनाथ तायडे हजर होते.













