अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेतर्फे शहरातील विविध प्रभागात डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे. यात प्रभाग क्रमांक १३ मधील देशमुख बंगला, दुर्गा हॉस्पिटल, तरुण कुढापा मित्र मंडळ, नागेश्वर मित्र मंडळ तसेच छत्रपती चौक परिसरात कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने रस्ता डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
यावेळी कामाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्बन बँक चेअरमन अभिषेक पाटील, बाबु साळुंके, परीसरातील नागरीक ईश्वर देशमुख, महारु आण्णा, प्रा. मुकेश वाल्हे, भटु जैन, सौरभ पाटील, बंटी देशमुख, किरण महाजन, पप्पु देशमुख आदी उपस्थित होते. सदर रस्ताचे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी पालिकेचे आभार व्यक्त केले.