धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासह राज्यात ३८ हजार गावांना लहान – मोठ्या पाणीपुरवठा योजनां मंजूर केल्या असून कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. जिल्ह्यात विकासकामे करीत असतांना मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. फटफटीच्या काळजीपेक्षा शेतकरी व मुक्या प्राण्याचे आशीर्वाद महत्वाचे असून त्यासाठी शेती रस्ते दर्जोन्नत करून शेतकरी हितासाठी शेत रस्ते डांबरीकरणावर अधिक भर दिलेला आहे. गावातील एकोपा व कार्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका गावाच्या प्रगतीसाठी तारक असते. कार्यकर्त्याची शक्ती उद्भूत असते. त्यामुळे मी व माझा पक्ष हा कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न करता राज्याच्या मंत्री पदाची जबाबदारी असून सुद्धा सिझनेबल पुढारीपणा न करता सततच्या संपर्कामुळे तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरण, साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम व गाव विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथे आयोजित जाहीर सभेत केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार हे होते.
या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !
चिंचपुरा ते वराड रस्ता डांबरीकरण करणे – 1 कोटी 24 लक्ष, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना 19 लक्ष या कामांचे भूमिपूजन तर मूलभूत सुविधा योजने अंतर्गत ( 2515) मधून गावांतर्गत काँक्रिटीकरण – 8 लक्ष, सामाजिक सभागृह बांधकाम – 10 लक्ष , आमदार निधीतून कॉन्क्रीटीकरण – 5 लक्ष , जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम – 4 लक्ष, तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत कॉन्क्रीटीकरण – 5 लक्ष या कामांचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात आरती
चिंचपुरा गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी ना. गुलाबाराव पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून ना. गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. जागोजागी स्वागत बॅनर लावण्यात आले होते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तसेच विठ्ठल मंदिरात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
बँकेचे चेअरमन संजय पवार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती- पातीचे राजकारण कधीही केले नाही. त्यांनी मराठा समाजासह अन्य समाजाला प्रतिनिधित्व देऊन व सोबत घेऊन पक्ष विरहित काम करीत आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा सार्थ अभिमान असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी सन २०२२२ चे केवळ मुद्दल भरण्याचे आवाहन केले. सन १९९१ पासून मी निवडणुका जिंकत आलो असलो तरी मला चेअरमन पद मिळणे शक्य नव्हते. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच चेअरमन पदाची संधी प्राप्त झाली. नाही तर मरेपर्यंत चेअरमन झालो नसतो असे रोख – ठोक वक्तव्य जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी चिंचपुरा येथे केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन व प्रसाताविक दिनकर पाटील सर यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील , जेडीसीसी बँक चेअरमन संजय पवार, उप जिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, जि .प. सदस्य प्रतापराव पाटील ,गोपाल चौधरी, सरपंच सौ. आशाबाई कैलास पाटील, उपसरपंच गुलाब मोरे, ग्रा. पं. सदस्य कैलास पाटील, चिंध्याबाई पाटील, अर्चनाताई पाटील, शिवाजी नन्नवरे, उज्वलाताई कोळी, सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, विलास महाजन, मुकुंदराव नन्नवरे, मोहन पाटील, भानुदास विसावे ,रवींद्र चव्हाण सर, डी.ओ. पाटील, प्रकाश पाटील,सौ. प्रिया इंगळे , शहर प्रमुख विलास महाजन भगवान महाजन यांच्यासह यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते ग्रामपंचायत , वि.का. सोसायटी चे पदाधिकारी आणि शिवसेना युवा, सेना पदाधिकारी यांनी घेतले परिश्रम घेतले.