मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कार्यालयावर छापेमारी सुरु आहे.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयावर ईडीचं छापासत्र सुरू आहे. नंदुरबार, बारामती, साताऱ्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. तर बारामतीत आयकर विभागाची छापेमारी रात्री उशीरापर्यंत होती सुरू होती. पुणे जिल्ह्यातील बारामतीत श्रायबर डायनामिक्स मिल्क डेअरीत आणि दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगरमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. सलग तीन दिवसांपासुन तपासणी सुरु आहे.
अहमदनगरमध्येही सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून तपासणी आहे. तर नंदुरबारमधील समशेरपुरच्या आयान मल्टीट्रेड एलएलपी कारख्यान्यावर आयकर विभागाची टीम रात्री उशीरापर्यंत चौकशी करत होती. कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे. तसेच कारखाना व्यवस्थापनानेही मौन बाळगले आहे. एका प्रमुख अधिकाऱ्यासोबत १२ ते १५ जणांचे पथक असल्याची सूत्रांची माहिती आहे. आजही चौकशी पुढे सुरु राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.