पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून जो चमगाव गावाने जो विश्वास शिवसेनेवर दाखवला त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे ग्रामस्थांना वचन देवून पदाधीकाऱ्यांनी जास्तीत जास्त शिवसैनिकांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्या विकासाभिमुख वाटचालीमुळे लोकांचा शिवसेनेकडे तरूणांचा व ग्रामस्थांचा कल वाढल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यांच्या हाती भगवा !
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विविध विकास कामांमुळे कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून येथिल युवा कार्यकर्ते विजय सांवत, राजेंद्र सांवत, सुदाम सांवत, बापु सांवत, योगेश कोळी, बंधन कोळी, राकेश कोळी, दाधू शिरसाठ, संजय शिरसाठ, रोहित शिरसाठ, हरचंद भिल, गोरख भिल, आप्पा भिल, ऊखा भिल व विजू भिल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.