नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल, असा इशाराच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिल्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. मात्र, यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत रुग्णालयांनी विशेष तयारी करणे गरजेचे आहे. चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉनची लागण झालेल्या एका व्यक्तीचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे आणि मृत्यूची ही जगातील पहिलीच घटना आहे.
रुग्णालयाती रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटले आहे, की जागतिक स्तरावर व्हेरिअंट ऑफ कंसर्नशी संबंधित रुग्णसंखेत वाढ झाल्याने, हॉस्पिटलायझेशन आणि मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे. याच वेळी, या नव्या व्हेरिअंटने संक्रमित झालेल्या लोकांच्या स्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणखी माहितीची आवश्यकता आहे. यामुळे देशांनी रुग्णालयात दाखल रुग्णांशी संबंधित माहिती शेअर करावी, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. सध्या हा नवा व्हेरिअंट ६० हून अधिक देशांत पसरला आहे.