धरणगाव (प्रतिनिधी) शेतमजुरांना अश्लिल तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धरणगाव येथील बिपीन जगन्नाथ तिवारी याच्या शेतात डाळ तोडण्याचे कामासाठी एका मुकादमच्या माध्यमातून जाण्याचे सांगीतले होते. त्यानुसार १०-१२ महिला-पुरुष मजूर दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास शेतात कामास गेले होते. तेव्हा शेतात काम करीत असताना एक महिला मजूर हि भरलेला डाळिंबचा कोट ट्रक्टरमध्ये खाली करण्यासाठी गेली असता ट्रक्टरजवळ उभे असलेले शेत मालक बिपीन तिवारी यांनी घाणेरडी शिवी दिली.
संबंधित महिलेने घडलेली घटना सहकाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी तिवारी काका तुम्ही असे का बोलले?, असा जाब विचारला असता त्यांनी पुन्हा घाण-घाण शिव्या द्यायला सुरुवात केली. तसेच तुम्हाला ईथेच खल्लास करून टाकतो. तुम्हाला धरणगावही पास करू देत नाही, अशी धमकी दिली. यानंतर एका शेतमजूर पुरुषालाही आम्हास तुम्ही शेरभर अनाज भिकारी आहेत. तुमची काम करण्याची दाणत नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दरम्यान, या प्रकरणी शेतमालक बिपीन तिवारी यांच्याविरुद्ध पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून ३५४,२९४,५०९,५०६,3(1)(r),3(1) (s),3(1) (u),(3(1) (w),[3 (2) (va) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेष रावले हे करीत आहेत. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शेतमालकही आपली तक्रार पोलिसात देत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.