जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय विवाहितेला इंस्टाग्रामवर अश्लिल मॅसेज पाठवत विनयभंग केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विवाहितेस सोशल मिडीयावरील इन्स्टाग्राममवरून दि १५ ऑक्टोबरपासून ते ८ नोव्हेबरपर्यंत विवाहितेच्या मोबाईल नंबरवर वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच एकेदिवशी विवाहिता दुकानात वस्तू घेण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी संशयित आरोपी प्रेम नाईक(पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.राजेद्र उगले हे करीत आहेत.