जकार्ता (वृत्तसंस्था) इंडोनेशियामध्ये भयंकर दुर्देवी घटना घडली आहे. इंडोनेशियाच्या बॅन्टेन येथील तुरुंगात भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत ४० कैद्यांचा मृत्यू झाला आहे. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मध्यरात्री १ किंवा २ च्या सुमारास आग लागली. यावेळी बहुतेक कैदी झोपले होते. टेंगरंग कारागृहाचा ताबा घेण्यासाठी शेकडो पोलिस आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तुरुंगात १,२२५ कैद्यांची क्षमता असताना २००० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जेव्हा आग लागली तेव्हा ब्लॉक सी १२२ कैदी होते. काही तासांनंतर आग विझवली गेली आहे आणि सर्व पीडितांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इंडोनेशियात तुरुंगातून पळून जाण्याची आणि दंगली होण्याचा घटना नेहमी घडत असतात. या तुरुंगात मोठ्या संख्येने बेकायदेशीर ड्रग्जच्या विरोधात अटक झालेल्या कैद्याना ठेवण्यात आलं आहे.