TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार : युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ

फाली संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारतातील भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले.

‘फालीच्या उपक्रमामुळे शेतीकडे नव पिढी वळते आहे. शेतीतील नव संशोधन हे सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा. आपले कुटुंब आणि आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशातील शेतीची प्रगती उत्तम होईल असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.’ ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या सत्राच्या समारोपात मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी, फाली जाकिट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ, उपाध्यक्ष सान्ड्रा श्रॉफ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फालीच्या संस्थापिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, गोदरेज अग्रोवेटचे यूपीएलचे आशिष डोभाल, अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी ६७ शेती व्यवसाय योजना आणि ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांविषयी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या दोन्ही सादरीकरणातून जे अव्वल ठरलेल्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यवसाय योजना तसेच नाविन्यपूर्ण शेती उपकरणांमध्ये पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, ‘तुमच्या नावीण्यपूर्ण व्यवसाय योजना आणि तंत्रज्ञान सादरीकरण स्पर्धेमुळे मी खूप प्रभावीत झालो आहे. आम्ही इथे पाहिले की, फाली विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहिली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगी तांत्रिक नावीण्य असलेली उत्पादने निर्माण केली. फाली उपक्रमात तुमच्यात ज्ञानाची ज्योत जागृत करण्याची क्षमता आहे हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला अॅग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षकांनी तुम्हाला व्यवहार ज्ञान दिलेच आहे आणि तुम्ही वास्तवातील आधुनिक व शाश्वत शेतीसाठी जोखीम घेणे हे पण समजून घेतले आहे. ही भविष्यातील शेतीत काम करण्याची क्षमता ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो.’ असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या मुख्य भाषणातून व्यक्त केले. माजी फाली विदयार्थ्यांसाठी फाली उपक्रम काही कार्यक्रम विकसित करत आहे याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही कधीतरी समाजाला काही परत द्याल. तुमच्यापैकी काही जण पुढे अॅग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षक व्हाल. तुमच्यापैकी काही जण यशस्वी शेतकरी व्हाल किंवा भावी फाली विदयार्थ्यांना पाठिंबा देणारे व पुरस्कृत करणारे उद्योजक म्हणून कार्य कराल. हेच जीवनाचे वर्तुळ आहे असे मला वाटते.

यावेळी जैनफार्म फ्रेशफूडचे संचालक अथांग जैन यांनी मार्गदर्शन केले. ‘जे काम हाती घ्याल ते उत्तम गुणवत्तेचे तर करावेच परंतु त्यात आपण अव्वल कसे असू हा दृष्टीकोन नक्की ठेवावा. त्यासाठी माझ्या आजोबांचे उदाहरण तुमच्यासमोर देतो. आजोबांकडे दूरदृष्टी होती आणि त्यांच्याकडे स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि सहनशीलता होती. तुम्ही टिश्यूकल्चर विभागाला भेट दिली असेल व तिथले कामकाज बघितले असेल. श्री भवरलालजी जैन उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर देत असत आणि त्यांच्या दृष्टीने उत्पादन चांगल्या गुणवततेचे निर्माण करणे बरोबर होते.’ असे मोलाचे विचार अथांग जैन यांनी व्यक्त केले.

नावीन्यपूर्ण (इन्होवेशन) शेती उपकरणांमधील विजेते

सॉईल मोईश्चर ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम, भारत माता विद्यालय मायनी, सातारा (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे, (द्वितीय), अग्रिकल्चर मल्टिपर्पज इम्पिमेंट, श्रीराम विद्यालय नांदगोमुख नागपूर (तृतिय), मल्टिपल बेनिफीट टूल, रावजी फते विद्यालय खराशी पुणे (चतुर्थ), फर्टिलायझर एप्लिकेटर महात्मा गांधी विद्यालय कर्जत (पाचवा) हे विजेते ठरले.

व्यवसाय (बिझनेस) योजनामधील विजेते

केळी संदर्भातील उत्पादन, सातपुडा विद्यालय लोणखेडा, नंदुरबार (प्रथम), बायोइंजायम गोल्डन लिक्वीड, हिरकणी विद्यालय गावडेवाडी पुणे (द्वितीय), जिरेनियम ऑईल प्रॉडोक्शन कुलस्वामिनी खांदेराई विद्यालय हिवरे, पुणे (तृतीय), इंडिग्रेटेट फार्मिंग सिस्टीम्स, महात्मा गांधी विद्यालय कर्जत, अहमदनगर (चतुर्थ), बेकरी प्रोडक्ट, श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (पाचवा) हे विजेते ठरले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार ३ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी स्मिताताईंना खासदार म्हणून निवडून देणे गरजेचे : आ मंगेशदादा चव्हाण !

April 3, 2024

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन” ; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

August 15, 2021

भुसावळात गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात !

March 20, 2024

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group