भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरात शालेय पोषण आहार वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार होतांना दिसत आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे धान्यवाटप भुसावळ शहरामध्ये विद्यार्थ्यांना होत आहे आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदार संगनमताने कारभार होतांना दिसत आहे. यासंबंधीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी तक्रार गट विस्तार शिक्षण अधिकारी वायकोळे व प्रधान यांना दिली होती.
या तक्राराची चौकशी करणे कामी शिक्षण विस्तार अधिकारी वायकोळे व प्रधान व पथक दिनांक ६ मे २०२२ रोजी सकाळी तु,स, झोपे शाळे मध्ये सोबत पथक घेऊन दाखल झाले. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची चौकशी करून सर्व प्रकार उघडकीस केला. दिनांक ५ मे २०२२ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी वायकोळे यांनी मुख्याध्यापक यांची भेट घेऊन वाटप होत असलेल्या धान्य गोडाऊनला सिल केले होते. तसेच संबंधित अधिकार्यांवर व कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीने मागणी केली होती. तसेच वरिष्ठांनी याची तात्काळ दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता.
आजरोजी सकाळी तु,स, झोपे शाळे मध्ये गट विस्तार शिक्षण अधिकारी वायकोळे व प्रधान तसेच पथक दाखल होऊन धान्य गोडाऊनला सिल लावलेले उघडून विद्यार्थ्यांना जे शालेय पोषण आहार वाटप करण्यात येत होता. त्या सर्व पोषण आहाराचे सॅम्पल ताब्यात घेऊन औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती गट विस्तार शिक्षण अधिकारी वायकोळे यांनी दिली.