जळगाव (प्रतिनिधी) पायी जाणाऱ्या तरुणावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील मानराज पार्कजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश राजेंद्र सोनवणे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अविनाश सोनवणे (वय-२४ रा. वांभोरी ता. धरणगाव जि. जळगाव) हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराजपार्क समोरील नवजिवन शुपर शॉपच्या वाजूला राहणारे सुशिल साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी रोजी अनिवाश दिवसभर ट्रीप करून सायंकाळी मालकाकडे रात्री १०.३० वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसवल्याने अविनाश यांनी मागे वसलेल्या तरुणाला लागलीच पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले. व दोघे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.