जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रोडवरील फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. या ठिकाणाहून ३१ लॅपटॉप, ७ मोबाईलसह इतर साहित्य फॉरेन्सीकच्या पथकाने जप्त केले. या कॉल सेंटरमधून आंतराष्ट्रीय पातळीवर विदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणुक केली जात असल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या कॉल सेंटरवर कारवाई झाल्यामुळे राज्यात खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील ममुराबाद रस्त्यावर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह अधिकारी व कर्मचान्यांच्या पथकाने रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत फार्महाऊसच्या वातानुकुलीत दुमजली इमारतीच्या खालच्या मजल्यावरील हॉलमध्ये कार्पोरेट कॉल सेंटर तयार करण्यात आले होते. याठिकाणी सुमारे २५ ते ३० जणांना बसण्यासाठी (क्युविकल्स) ची स्वतंत्र व्यवरथा देखील तयार करण्यात आली होती.
हुक्का पॉटसह कॉल सेंटरचे साहित्य जाम
या कारवाईत ३१ लॅपटॉप, मोचाईल, खुर्चा, टेबल, वायफाय, राऊटर, पोडीअम या कॉल सेंटरच्या साहित्यासह हुक्का पॉट देखील पोलिसांनी जप्त केला,
गुन्हा दाखल होताच केली अटक
फार्म हाऊसमधील कॉल सेंटवरच्या कारवाईनंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात जाला. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे, राकेश चंदू अगारिया, नरेंद्र अगारिया बांच्यासह कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शाहबाज आलम, झिशान नूरी, शाकीब आलम, हिशीर राशी, स्वयंपाकी (कुक) अली (सर्व रा. कोलकता, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली.
फार्म हाऊस शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मालकीचे
पोलिसांनी कारवाई केलेले कॉल सेंटर हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु होता. त्यांच्या पत्नी या सरिता माळी-कोल्हे या शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या फार्म हाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर सुरु होते. या कारवाईमुळे राज्यात खळबळ माजून गेली आहे.
















