धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध भागात विकास कामांच्या नावाखाली बोगस आणि नित्कृष्ठ दर्ज्याची कामे सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नव्हे तर या कामांची चौकशी करावी, अन्यथा भाजपा उपोषणाला बसेल असा इशारा देण्यात आला आहे.
मक्तेदारांचे हित साधण्यासाठी संगनमताने सर्व भ्रष्ट कामे सुरू
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध परिसरात गटार,पेव्हर ब्लॉक,कॉक्रीट रोड इत्यादी कामे अंदाजपत्रका नुसार झालेली नाहीत. कामाच्या ठिकाणी सिमेंट,खडी,रेती,पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध दिसून येत नाही. नगरपालिकेचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सूरु असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करत नाहीत. मक्तेदारांचे हित साधून संगनमताने सर्व भ्रष्ट कामे सुरू आहेत. याआधीही भारतीय जनता पार्टीने शहरातील बोगस कामाविषयी तक्रार अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
धरणी नाल्याचे बांधकाम बोगस ; कामाचे बिल अदा करू नये
भाजपने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील धरणी नाल्याचे बांधकाम काम दलितोत्तर योजने अंतर्गत सध्या सुरू आहे,सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट पध्द्तीने करण्यात येत आहे. २ कोटीचे काम मक्तेदार अतिशय हलगर्जीपणा करून मोठ्या प्रमाणात शासकीय पैसाचा भ्रष्टाचार करतांना दिसून येत आहे. तरी सदरील कामाचे बिल अदा करू नये व कामाची चौकशी करण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टी लवकरच उपोषणाला बसणार आहे. त्या आशयाचा तक्रार अर्ज मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक शरद अण्णा धनगर,ललित येवले,संतोष चौधरी,कन्हैया रायपूरकर,टोनी महाजन,जूलाल भोई,राजू महाजन,वासुदेव महाजन,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.