TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाणीपुरवठा योजनांचा धडाका : जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांसाठी तब्बल ९६ कोटी निधींची तरतूद !

पहूर कसबे, पहूरपेठ, टाकळी, उचंदे व ७ गाव, कंडारी आणि साकेगावचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ६ प्रमुख गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना, तसेच भुसावळ तालुक्यातील कंडारी आणि साकेगाव या गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ९६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून महिना अखेरीस अजून ८ – १० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाच्या योजनांना मंजुरी देण्याचा धडाका लावल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यांतील आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार ४- ५ दिवसांपूर्वी मंत्रालयात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना ना. मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व एम.जी.पी.ला दिले आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

६ गावांसाठी ९६ कोटी निधीची तरतूद !

या योजनांमध्ये जळगाव जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे – ३४ कोटी १५ लक्ष ८७ हजार; मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना १३ कोटी ४५ लक्ष ८९ हजार; चाळीसगाव तालुक्यातील टाकळी – २१ कोटी ३२ लक्ष रूपये ८९ हजार; भुसावळ तालुक्यातील कंडार- १७ कोटी ८९ लक्ष ९ हजार रूपये तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव-८, ६२ लक्ष १५ हजार या गावांच्या योजनांचा समावेश आहे. यासाठी एकूण ९५ कोटी ४५ लक्ष ८९ हजार रूपयांच्या निधीती तरतूद करण्यात आलेली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अलीकडेच पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. यातच आता ४ तालुक्यांमधील ६ गावांच्या योजनांना मार्ग मोकळा झाला असून याच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. तर, या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील अजून ८-१० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकीकडे लहान आणि मध्यम लोकसंख्येच्या गावांच्या योजनांसाठीचा जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार योजनांनाची कामे सुरू झाली आहेत. तर याच्याच जोडीला मोठी गावे असणार्‍या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजनांना सुध्दा आमचे प्राधान्य राहणार आहे. कोविडच्या काळातही राज्यासह जिल्हाभरात आपण सुरळीतपणे पाणीपुरवठा करू शकलो याचे मला मनस्वी समाधान आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती तहानलेला राहू नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! फुजियान प्रांतात ३६ मुलांना कोरोनाची लागण, शाळा बंद !

September 15, 2021

खळबळजनक : जळगावात बेपत्ता तरुणाचा खून ; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

December 12, 2022

अर्णब गोस्वामींचं उद्धव ठाकरेंना आव्हान

November 12, 2020

येवतीच्या ऋषिकेश सावरीपगारचा नेपाळमध्ये डंका ; १०० मीटर अडथळा शर्यतमध्ये प्रथम !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group