फैजपूर (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा अंतर्गत उपकेंद्र आमोदा येथील पिंपरुड गावातील जि. प. शाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे मार्गदर्शनाखाली सिकलसेल सप्ताह कार्यक्रम तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. आरोग्य सेविका वैशाली तळेले यांनी १०० लोकांची सिकलसेल तपासणी केली. सी. एच. ओ. डॉ. अतुल वायकोळे यांनी मदत केली यावेळी सुहास कुलकर्णी सिकलसेल सहाय्यक यांनी सिकलसेल या आजाराबद्दल मोलाची माहिती दिली. डोळे साहेब पर्यवेक्षक हिंगोणा, अंगणवाडी सेविका गिरीजा पाटील, रजनी चौधरी, ज्योती पाटील, आशा वर्कर शारदा कोळी यांनी सहकार्य केले तसेच सामाजीक कार्यकर्ता राहुल कोल्हे उपस्थित यांनी कार्यक्रमाला भेट दिली.