जळगाव (प्रतिनिधी) काही योजनांमधील नियमित गुंतवणूक (Investment) तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. अशीच एक योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF). ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते. पोस्ट ऑफिसद्वारेदेखील (Post Office)ही योजना चालवली जाते. ही एक अल्पबचत योजना (Small savings scheme)आहे.
पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ (PPF Scheme) योजनेत गुंतवणूक केल्यास उत्तम आणि खात्रीशीर रिटर्न मिळतो. यामध्ये तुम्ही वर्षाला कमाल 1 लाख 50 हजार रुपये म्हणजेच 12 हजार 500 रुपये प्रति महिना जमा करू शकता. दररोजच्या हिशोबाने ही रक्कम 400 रुपयांपेक्षा थोडी जास्त होते. जर तुम्ही 15 वर्षे दरमहा 12500 रुपये जमा केले तर शेवटी तुम्हाला 40 लाख 70 हजार रुपये मिळतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्षांपर्यंत केला तर शेवटी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील.
वार्षिक व्याज 7.1 टक्के
पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्या वेगवेगळ्या योजनांवर वेगवेगळ्या टक्केवारीने व्याज मिळते. पीपीएफ योजनेत पोस्ट ऑफिसकडून 7.1 टक्के व्याज दिले जाते. गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज म्हणून ते जमा होते. दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केल्याने मोठा नफा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेमध्ये दर महिन्याला 12 हजार 500 रुपये जमा केल्यानंतर, 15 वर्षांच्या शेवटी, मॅच्युरिटी रक्कम सुमारे 41 लाख रुपये होईल.
25 वर्षात 1 कोटी रुपये मिळण्याचे गणित
जर तुम्ही या योजनेत 25 वर्षे दरमहा 12 हजार 500 रुपये जमा केले तर शेवटी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील.
यामध्ये तुम्ही जमा केलेली रक्कम 37 लाख 50 हजार असेल, तर व्याजाचा लाभ 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार 62.50 लाख असेल. या बाबतीत, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 कोटी रुपये मिळतील.
15 वर्षांत मिळतील सुमारे 41 लाख रुपये
पीपीएफ योजनेत तुम्ही दररोज 400 रुपये म्हणजेच एका महिन्यात 12 हजार 500 रुपये जमा केले तर वर्षभरासाठी दीड लाख रुपये.
15 वर्षांसाठी जमा केल्यानंतर, तुम्ही गुंतवलेली रक्कम 22 लाख 50 हजार रुपये होईल.
यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार तुम्हाला 18 लाख 20 हजार रुपये व्याज मिळेल.
अशा स्थितीत, शेवटी तुम्हाला 40 लाख 70 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल.