नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्र पोलिसातील (Maharashtra Police) १४ पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीला (Makar Sankranti) अनोखी भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस केडर जाहीर करण्यात आलं आहे. खरंतर २०१९ पासून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची यादी प्रलंबित होती. अखेर केंद्र सरकारने २०१९ आणि २०२० ची प्रलंबित यादी जाहीर केली आहे.
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये २०१९ च्या आठ आणि २०२० च्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे १४ अधिकाऱ्यांपैकी डी. एस. स्वामी आणि एस. पी. निशाणदार हे २०२० मुंबईत डिसीपी होते. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसातील ज्या १४ अधिकाऱ्यांना आयपीएस केडर मिळालं आहे ते आता थेट भारतीय पोलीस दलात असतील.
आयपीएस केडर मिळालेले १४ अधिकारी
सिलेक्शन – २०१९
एन ए अष्टेकर
मोहन दहिकर
विश्वा पानसरे
वसंत जाधव
श्रीमती स्मार्तन पाटील
एस डी कोकाटे
पी एम मोहीते
संजय लाटकर
सिलेक्शन – २०२०
सुनील भारद्वाज
सुनील कडासने
संजय बारकुंड
डी एस स्वामी
अमोल तांबे
एस पी निशाणदार