लखनऊ (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. तर उत्तर प्रदेशात स्वामी प्रसाद मौर्य या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. गेल्या महिन्याभराचा विचार केला तर एक-दोन नाही तर तब्बल १३ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे आता मोदी लाट ओसरली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या नेत्यांनी सोडली भाजपची साथ?
राधाकृष्ण शर्मा (बदायू जिल्ह्यातील बिल्सी येथून भाजपचे आमदार
राकेश राठोड (सीतापूरचे भाजप आमदार)
माधुरी वर्मा (बहराइचमधील नानपारा येथून आमदार)
जय चौबे (संत कबीरनगरचे आमदार)
राम इक्बाल सिंह (बलियातील चिलकलहर येथून माजी आमदार)
जय प्रकाश पांडे (प्रदेश प्रवक्ते)
अशोक कुमार वर्मा (भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस)
शशांक त्रिपाठी (प्रयागराजमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती)
कांती सिंह (भाजपचे माजी आमदार)
ब्रजेश मिश्रा (प्रतापगढ येथून भाजपचे माजी आमदार)
रमाकांत यादव (आजमगढ येथून माजी खासदार)
राकेश त्यागी (बुलंदशहर जिल्हा पंचायत सदस्य)
हेमंत निषाद (आग्रा)
ज्या प्रकारे एक एक करुन भाजपचे नेते पक्षाची साथ सोडून समाजवादी पक्ष आणि इतर पक्षात सहभागी होत आहेत ते पाहता येत्या निवडणुकीत समाजवादी पक्ष नक्कीच भाजपसाठी मोठी अडचण निर्माण करु शकतो. समाजवादी पक्षाकडून अधिकाधिक भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावम्याचे प्रयत्न सुरू आहेत.