पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे नुकतीच विकास सोसायटीची निवडणूक पार पडली असून त्यात ईश्वर धोबी यांचे सहकार पॅनल हे १३ विरुद्ध ५ या फरकाने एकतर्फी विजय मिळविला. तसेच चेअरमन पदी सुद्धा ईश्वर बच्छाव यांची एकमताने निवड करण्यात आली व चावलखेडा येथील छोटू पाटील यांची व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. नवनियुक्त चेअरमन व्हा चेअरमन यांचे मनोज पांडे, संजय ठाकुर, शिवा महाजन, घनश्याम चौधरी, मनोज शर्मा, निलेश शर्मा, संतोष पांडे, सुरेश धोबी, विकास बडगुजर, शंकर पवार यांच्यासह असंख्य नागरीकांनी अभिनंदन केले. निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विकासो सेक्रेटरीसोबत शिपाई राजु धोबी यांनी सहकार्य केले.