चाळीसगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. दौलतनाना शितोळे साहेब यांनी केला असून जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र जय मल्हार क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हयातील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सहकार्याध्यक्ष रमेश वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष अंकुश वाघ, राज्य कार्यकारणी सदस्य रवींद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष वाघ, उपाध्यक्ष नगराज वाघ, सचिव ज्ञानेश्वर सूर्यवंशी, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे, सचिव विशाल वाघ, तालुकाध्यक्ष भगवान जाम, दीपक काकडे, प्रकाश वाघ, रवींद्र शिंदे, नितीन सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, रमेश वाघ, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. जय मल्हार क्रांती संघटनेच्या जाहीर पाठींब्यामुळे चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या रामोशी, बेडर समाजाची ताकद महायुतीला मिळणार असून स्मिताताई यांच्या मताधिक्यात वाढ होणार आहे.