TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव : रविशंकर चलवदे !

शेतकऱ्यांनी महोत्सव प्रत्यक्ष अनुभवासाठी १४ जानेवारीपर्यंत भेट देण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा आणि फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघावी.’ असे आवाहन जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

जैन हिल्स वर १० जानेवारी २४ पर्यंत सुरू असलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. तंत्रज्ञानातून पिकपद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे अनुभवले. त्यांच्यासोबत आत्मा जळगावचे उपसंचालक श्री. साळवे, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ संजय सोनजे, डॉ. विकास बोरोले यांच्यासह कृषीतज्ज्ञ होते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीसाठी ते आले होते. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच चर्चा करताना इतर शेतकऱ्यांनीही या महोत्सवात सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी सांगितले की, ‘एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकांची लागवड जैन हिल्स कृषि महोत्सवात दिसून आली. यात केळी हे आपल्या भागातील प्रमूख पिक आहे. आर्थिक चलनवलन यापिकातून मोठ्याप्रमाणात होत असते. त्यात सात ते आठ प्रकारची केळी लागवड, ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पिक, ३० फूट उंचीचे केळीचे पिक अशी एकाच ठिकाणी विविध केळी पिकांची लागवड बघायला मिळत असल्याचे ते म्हणाले. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेता येत आहे.

तंत्रज्ञानासोबतच कुठले पिक घ्यावे, कसे घ्यावे, कुठली व्हरायटी लावावी असे एकच ठिकाणी वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे ते म्हणाले. शिवाय हळद, अद्रक, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग आहे. ह्यासंबंधीत अनेक व्हरायटीची माहिती याठिकाणी मिळते. कांदा हे आपल्या भागातील प्रमूख पिक घेतले जाते त्यात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरा लाल कांद्यासह अन्य जातींचाही पिकांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येत आहे. पांढऱ्या कांद्याच्या करार शेतीतून हमी भावाने कांदा व टमोटो खरेदी करून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल जात आहे. असे अनेक प्रकारांसह फळबागांमध्ये डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, लिंबू, पपई यासह अन्य फळपिकांची लागवड पद्धतीमध्ये बदल केला आहे.

अतिसघन लागवड पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग मिळत आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक, तुषार सिंचनासह अन्य पद्धतींसह ज्यांच्याकडे ५० ते १०० किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रामध्ये जैन ऑटोमेशन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यातून सिंचनासह फर्टिगेशन यंत्रणाद्वारे खतांचे नियंत्रण ठेवता येते व मजूरीवरील अतिरीक्त खर्च कमी करता येतो. एकाच ठिकाणी हे सर्व तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगाव सह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा. फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघायला मिळत आहेत. दिवसभर जैन हिल्सच्या संशोधन विकास केंद्राचे प्रक्षेत्र भेट द्यावी, व्यवस्थेच्यादृष्टीने नोंदणी करावी’ असे आवाहनही जळगाव आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

वनिता मल्टीस्पेशालियी हॉस्पिटलचा २४ डिसेंबर रोजी उद्‌घाटन सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

July 29, 2024

बनावट कॉल सेंटरवरच्या कारवाईचे ‘दिल्ली कनेक्शन’

October 1, 2025

धरणगाव महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने नवरंगी संवाद’ कार्यक्रम उत्साहात !

October 3, 2022

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group