जळगाव (प्रतिनिधी) बनावट कंपनी स्थापन करुन त्यामध्ये अधिक परताव्याचे अमिष दाखवून शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६५, रा. गजानन कॉलनी) या वकील महिलेने ७५ लाख रुपये गुंतविण्यास सांतगितले. दरम्यान, महिलेने परताव्यासह ९४ लाख १२ हजार रुपये परत मागितले असता, त्यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मनिष सतिष जैन, अतुल सतिष जैन, यशोदा उर्फ यशोमती सतिष जैन (तिघ रा. यश प्लाझा), जाफर खान मजीद खान रा. सुप्रिम कॉलनी, सीए अक्षय अग्रवाल, सेक्रेटरी केतन किशोर काबरा रा. जय नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गजानन कॉलनीत शिरीन अमरेलीवाला या वकील महिला वास्तवयास आहे. त्यांचे यश प्लाझा येथे राहणारे मनिष जैन यांच्या कुटुंबियांसोबत घरोबाचे संबंध आहे. डिसेंबर २०२१ मध्ये मनिषने त्यांना भूमी रत्नम रिअल इस्टेट प्रा. लि. नावाने कंपनी सुरु केली आहे. त्या कंपनीला व्यवहारासाठी रकमेची गरज असल्याने त्या कंपनीत रक्कम गुंतवणुक केल्यास त्यावर प्रतिमहा दीड टक्के परतावा देणार असल्याचे त्यांने सांगितले. त्या आकर्षक परताव्या लोभामुळे अमरेलीवाला यांनी डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून ७० लाख रुपये तर दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी ५ लाख रुपये रोख दिले होते. त्याबद्दल अमरेलीवाला यांच्याकडून त्याने कच्च्या पावत्या लिहून घेतल्या होत्या.
मनिष जैन हा परताव्याची रक्कम देखील अपुर्ण देत होता आणि आपण नंतर हिशोब करु असा देखील तो सांगत होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ पासून त्याने परतावा देणे देखील बंद केले होते. फ्लॅटची ऑफर आल्याने मागितले पैसे मुंबईत योग्य भावात फ्लॅटची ऑफर आल्याने शिरीन अमरेलीवाला यांनी ऑगस्ट २०२३ महिन्यात मनिष जैन यांना त्यांनी गुंतवलेली रक्कम परताव्यासह परत मागितली. त्याने ती रक्कम त्रयस्त इसमाकडे व्याजाने दिलेली असल्याचे सांगून थोडा वेळ द्या असे सांगितले. त्या इसमाकडून पैसे मिळाल्यानंतर ती रक्कम परताव्यास परत करेल असेही त्याने सांगितले
इतर दोघांच्या नावाने रजिष्टर केली बनावट कंपनी
वकील शिरीन अमरेलीवाला यांनी भूमी रत्नम या कंपनीबद्दल तपास केला असता, त्यांना ही कंपनी मनिष जैन यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या जाफर खान मजिद खान व विजय इंदरचंद ललवाणी यांना हाताशी धरुन तयार केली आहे. कंपनी रजिष्टसाठी खोट्या माहितीची पुर्ततेसाठी सीए अक्षय अग्रवाल, सेक्रेटरी केतन किशोर काबरा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अमरेलीवाला यांना फसविण्याचा कट रचून त्यांची फसवणुक केली. त्यानुसार सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे परत मागितल्याने दिली मारण्याची धमकी
डिसेंबरमध्ये मनिष जैन याने अमरेलीवाला यांना व्हाट्सअॅपवर मॅसेज पाठवले होते. त्यामुळे त्यांना आपली रक्कम परत मिळणार नसल्याचा संशय आला. त्यानुसार दि. २६ जानेवारी रोजी दोघ भाऊ परत आल्यानंतर त्या पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मनिष जैन याने मी रक्कम कंपनीत दिली आहे, ती कंपनी आमची नाही म्हणत तुम्हाला जे करायचे ते करुन घ्या असे सांगितले. त्यानंतर अरेलीवाला यांना तुमची रक्कम शंभर टक्के परत मिळेल ती पाच लोकांना दिल्याचे त्यांनी मॅसेजद्वारे सांगितले.