चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील काडी कारखाना परिसरात दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा अज्ञातांनी दगडफेक करून हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले व घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली आणि बंदुकीतुन हवेत गोळीबार केला. गोळीबारच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता तोपर्यंत दुचाकीवरून आलेले अज्ञात व्यक्ती पसार झाले होते. हा प्रकार ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण संशयित आरोपी सुमित भोसले याचे घर असल्याने हा गुन्हा सुमित भोसले व माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलांमधील पूर्व वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक जिवंत तीन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. या घटनेनंतर पोलिसांनी माजी नगरसेवकाच्या मुलाच्या घरातून जीवंत काडतुसांसह घातक शस्त्रे जप्त करत संशयित संकेत मोरे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्वतः करीत आ आहेत