जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या तरूणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात २२ वर्षीय तरूणी परिसत राहते. २८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा शैलेंद्र वासूदेव पाटील याने तरूणी घरात एकटी असतांना घराच्या मागच्या दरवाज्यातून थेट घरात शिरला. तसेच पिडीत तरुणीचा हात पकडून तु मला मारायला मुले का पाठविली?, असे म्हणून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या कुटुंबियांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री संशयित आरोपी शैलेंद्र वासूदेव पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी हे करीत आहे.