TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीड कोटींची फसवणूक ; जिल्हा बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड शाखेत झाला अपहार ; बँकेसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा संशयितांमध्ये समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

मेहुणबारे ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) पिलखोड येथील जळगाव जिल्हा बँक शाखेत तब्बल १ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन बँक शाखा व्यवस्थापकासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात लक्ष्मण देवराम पाटील (वय ५८ धंदा नोकरी रा. द्रोपदी नगर,जळगाव) यांनी मेहुणबारे पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि.१ जुलै २०१९ ते दि.१५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव शाखा पिलखोड ता. चाळीसगाव येथे विशाल रावसाहेब देशमुख (तत्कालीन शाखा व्यवस्थापक पिलखोड ता. चाळीसगाव, हल्ली तात्पुरते निलंबित) यांनी प्रशासन, व्यवस्थापन विभागाने त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर व दुरुपयोग करुन रविंद्र विश्वास पाटील, प्रविण शांताराम पाटील (रा. तामसवाडी ता. चाळीसगाव, फॉरेस्ट विभाग मालेगाव, सटाणा) व दिंडोरी, सामाजिक वनीकरण विभाग येथील तत्कालीन आरएफओ अधिकारी यांच्या सोबत कट कारस्थान व संगनमत करुन बँक शाखेत बनावट व खोटया सहया असलेले विड्रॉल स्लिपाव्दारे रक्कमा काढल्या आहेत.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

शाखा व्यवस्थापक विशाल रावसाहेब देशमुख यांना सदरच्या विड्रॉल स्लिपवरील सहया या बनावट व खोटया असल्याचे माहिती असून सुध्दा त्या खऱ्या आहेत, असे भासवून खऱ्या असल्याचे व्यवहारात वापर केलेला आहे. तसेच सदर बनावट सहया केलेल्या विड्रॉल स्लिपा या बँकेतून परस्पर गहाळ करून पुरावा नष्ट केलेला आहे. तसेच शेतकरी पिककर्ज भरणा रक्कमेत अपहार करुन त्यात बँकेच्या खात्यातून रक्कमा काढून त्या बँकेच्या वरीष्ठ कार्यालयाच्या लक्षात येवू नये म्हणून बँक शाखेचा खोटा हिशोब ठेवला आहे.

दि. १ जुलै २०१९ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये चौकशी अहवालातील रकमा वर्गवारीने जमा नावे करून रोखीने काढून गैरहेतूने गैरव्यवहार करुन बँकेची दिशाभूल करुन वेगवेगळया व्यवहारात एकुण रक्कम रुपये १ कोटी ५१ लाख ७५ हजार ४८२ रुपये रकमेचा अपहार केलेला आहे. तसेच याच कालावधीत शाखेचे अंतर्गत शाखा परिक्षण करणारे अधिकारी वसंत पुंडलीक पाटील यांनी पिलखोड शाखेची अंतर्गत तपासणी करतांना त्यांनी शाखेतील कोणत्याही प्रकारची दस्ताऐवजाची परिक्षण न करता तसेच वरील प्रकरणांकडे मुदाम दुर्लक्ष करून शाखेची अंतर्गत तपासणी अहवाला कोणत्याही प्रकारची त्रुटया व शक अहवालात दर्शविला नाही.

या प्रकरणी विशाल रावसाहेब देशमुख (रा. देशमुखवाडी ता. चाळीसगाव), रविंद्र विश्वास पाटील, प्रविण शांताराम पाटील, तत्कालीन RFO, फॉरेस्ट विभाग मालेगाव, तत्कालीन RFO, फॉरेस्ट विभाग सटाणा, तत्कालीन RFO, फॉरेस्ट विभाग दिंडोरी, तत्कालीन RFO सामाजिक वनीकरण विभाग (नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पो.उप निरी. सुदाम काकडे हे करीत आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार वन विभागात अशा प्रकारचा अपहार जिल्ह्यासह राज्यभर सुरु असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

तरुणीवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ, लग्नासाठीही जबरदस्ती ; मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किनगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

February 15, 2021

पिगॅसस स्पायवेअर प्रकरणामागे भारत सरकार नाही तर मग कोण ? : सुब्रहमण्यम स्वामी

July 20, 2021

नांदेड येथील तरूणाचा बिड जिल्ह्यातील अपघातात मृत्यू !

December 6, 2020

शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देताना विजेचा जोरदार धक्का ; आजोबासह नातवाचा मृत्यू !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group