जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बहुचर्चित असलेला छत्रपती शिवाजी महाराज नगर उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्याबाबत नगरसेवक दिलीप पोकळे हे दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांना आवाहन करीत होते. परंतू नागरिकांच्या विरोधामुळे नगरसेवक पोकळे यांनी आपले आंदोलन गुंडाळले.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील जिल्हा परिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाचे गेल्या ३ ते ४ वर्षपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु आजपर्यंत हे काम सुरूच आहे. याबाबत आज नगरसेवक दिलीप पोकळे यांनी आज पुलाबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतू नागरिकांच्या विरोधामुळे नगरसेवकांना हे आंदोलनच त्यांना गुंडाळावे लागले आहे. याठिकाणी परिसरातील नागरिक एकत्र येऊन या पुलाचे उदघाटन कुठलेही राजकीय व्यक्ती करणार नाही. तर ज्या युवतीचा या पुलामुळे जीव गेला होता. त्या मयत युवतीच्या परिवाराला उदघाटनाचा हक्क मिळावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. याप्रसंगी भगवान सोनवणे, विजय राठोड, संदीप महाले, विनायक पाटील, विशाल वाघ, योगेश साळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.