जळगाव (प्रतिनिधी) फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर जवळीक साधल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐजाज इंद्रिस खाटीक, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत २५ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२२ तसेच १ मे रोजी ऐजाज खाटीक याने फेसबुकवर ओळख निर्माण करून प्रथम पिडीता घरी एकटी असतांना तिच्या घरी येवून पिडीतेस लग्नाचे आमीष दाखवून तर दुसरी वेळेस पिडीता घरी एकटी असतांना तिच्या राहते घरात घुसून इच्छेविरुद्ध फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी ऐजाज खाटीकविरुद्ध ३७६,४५२,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनिरी रूपाली महाजन ह्या करीत आहेत.