जळगाव (प्रतिनिधी) घर बंद असतांना अचानक झालेल्या शॉटसर्कीटमुळे घरात आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शहरातील समता नगरातील धामणवाडा येथे घडली आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.,
जळगाव शहरातील समता नगरातील धामणवाडा परिसरा किशोर सदाशिव चव्हाण हे वास्तव्याला आहे. त्याचे पत्र्याचे घर आहे. शनिवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चव्हाण हे कामावर गेले तर त्यांच्या पत्नी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद घरात अचानकपणे अचानक आग लागली. ही घटना समजताच या परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्या वेळी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यापूर्वीच आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याच्या सहायाने आग विझविली. मात्र तोपर्यंत घरातील कपडे, अंथरुण, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.