TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अवैध बॅनरविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची पोलिसात तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात टॉवर चौक, मनपा चे सतरा मजली इमारत समोर, नेहरु चौकातील नेहरु पुतळ्या समोर व कोर्ट चौकत व शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी तसचे जळगाव शहरात मनपा हद्दीमध्ये अवैधरित्या बॅनर/झेंडे लावुन शिवसेनेनं शहराचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ?

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज दि. २७ मे २०२२ रोजी ११.३० वाजेचे दरम्यान मी मनपा जळगाव यांचे सतरा मजली इमारती समोरुन जात असतांना दोन दुचाकी स्वारांची दुभाजकावर लावलेल्या अवैध बॅनरमुळे किरकोळ अपघात झाला. व त्यांच्यात आपसात भांडण झाले. त्याच्या भांडणाचे चित्रीकरण झी 24 तास या वृत्तवाहिनीने केले असून सदर अपघात झालेले भांडण करते हे तक्रार न देता सदर ठिकाणा वरुन निघुन गेले. मी एक सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने सदर बॅनर बाबत जळगाव मनपा येथे जावुन तपास करता सदर बॅनर लावणारे यांचेकडेस काही बॅनर लावण्याची परवानगी जळगाव मनपा यांनी दिलेली आहे. परंतु, त्यांचेकडे पोलीस विभागाकडील परवानगी नाही तसेच त्यांनी मनपाकडुन बॅनरीची परवानगी देतांना २० नियम व अटी शर्ती घालुन देण्यात आलेले आहे. त्या २० पैकी क्रं. ०१ वर संबंधित स्थानिक पोस्टे व शहर वाहतुक नियंत्रण शाखेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ते त्यांनी घेतलेली नाही तसेच २० पैकी क्रं. ०४ वर फलकावर मनपाची पावती क्रं. व दिनांक तसेच मुदतीचे दि. पासुन पर्यंत नमुद करणे बंधनकारक आहे. परंतु, मनपा गेट समोर रोडावरील दुभाजकवर लावलेले बॅनरमध्ये त्यांनी ते नमुद केलेले नाही. तसेच २० पैकी अट क्रं. ११ वर महापुरुषांचे स्मारकाजवळ जाहिरात फलक/होल्डींग/कापडी फलक/झेंडे/पोस्टर्स लावता येणार नाहीत. वस्तुस्थिती पाहता पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे पुतळ्याजवळ शिवसंपर्क अभियानाचे झेंडे व पुतळयाजवळ बॅनर लावलेले आहेत. जे अटी क्रं. ११ चे उल्लघंन आहे. तसेच २० पैकी अटी क्रं. १५ वर असे नमुद आहे की, रस्त्याचे दुभाजकामध्ये जाहिरात फलक (होल्डींग) कापड फलक/झेंडे/पोस्टर्स लावता येणार नाही. परंतु, मनपा सतरा मजली ईमारत समोर रोडवर दुभाजक व शहरातील अनेक दुभाजकवर शिवसंपर्क अभियानाचे बॅनर व झेंडे लावण्यात आले आहे. जे अटी क्रं २० पैकी १५ चे उल्लघंन आहे.

माझ्या शहरातील सौंदर्यकरण हितासाठी मी अनेकदा जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधिक्षक, तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांचे कडे अवैध बॅनर/होल्डींग यांची तक्रार केलेली होती. त्याची दखल घेवुन तिन्ही वरिष्ठ अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी १ ऑक्टोंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेवुन सांगितले होते की, यापुढे २ ऑक्टोबर २०२१ पासुन महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगाव शहरात स्वच्छता अभियान राबवुन यापुढे जे कोणी अवैध बॅनर/होल्डींग लावेल त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व जनतेला आव्हान केले होते की, यापुढे कोणीही अवैध बॅनर लावणार नाही यापुढे जो कोणी व्यक्ती, संस्था, पार्टी, पक्ष बेकायदेशी बॅनर लावेल त्यांचे विरुध्द दंडात्मक व फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील. परंतु, शिवसंपर्क अभियान राबवतांना अवैध बॅनर लावणारे शिवसेना पार्टी जळगावचे संबंधित पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे व तत्कालीन मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी या तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांची दिलेली सुचना/आव्हान यांचे पालन केले नाही व शहरात अनेक ठिकाणी मनपा कडील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे लवलेले बॅनर हे बेकायदेशीर ठरता. त्यामुळे जनहितार्थ माझी संबंधित अवैध बॅनर लावणारे शिवसेना पार्टीचे संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जळगाव शहरात टॉवर चौक, मनपाचे सतरा मजली इमारत समोर, नेहरु चौकातील नेहरु पुतळ्यासमोर व कोर्ट चौकत व शहर पोलीस स्टेशन यांचे हद्देत अनेक ठिकाणी तसचे जळगाव शहरात मनपा चे हद्दीमध्ये अवैधरित्या बॅनर/झेंडे लावुन शहराचे विकृतीकरण केले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द तसेच आज रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी असतांना नेहरुजींच्या पुष्पहार घालतेवेळी पुतळयाजवळ शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाचे झेंडे लागलेले होते. त्या जागी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी झेंडे काढण्याची सुचना न देता नेहरुजींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला असून त्यांनी सदर महापुरुषाच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे. त्यामुळे माझी त्यांचे विरुध्द पण जनहितार्थ कायदेशी तक्रार असुन वरील बॅनर/होल्डींग लावल्यामुळे किरकोळ अपघाताप्रमाणे भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. करीता असा अपघात होणार नाही या उद्देशाने महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम १९९५ चे कलम ३ व ७ अन्वये तसेच अन्य प्रचलित कायद्यानुसार माझी कायदेशीर तक्रार असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, शनिवार २८ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 24, 2025

मध्य रेल्वे विशेष तपासणी मोहीम; विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल

November 28, 2020

धरणगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; मानाची कुस्ती बरोबरीत सुटली !

April 26, 2023

‘..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध’ : एकनाथराव खडसे

February 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group