TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अपार्टमेंटमधील बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई !

तीन लाख रुपयांचा ऐवज नेला चोरुन; परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
January 15, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी येथील सिताराम शंभू रेसीडेन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याठिकाणाहून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी येथील शिवनगरात सिताराम शंभू रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये रविंद्र जगन्नाथ मगरे (वय ४८) हे वास्तव्यास असून त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये त्यांच्या घराच्या खाली समोरासमोर राजेश सिताराम पाली व भगवान बाबूराव माळी हे वास्तव्यास आहे. सोमवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी मगरे हे बाहेर गावाहून घरी आले असता, त्यांना अपार्टमेंटच्या खाली गर्दी असल्याचे दिसले. त्यांनी संबंधितांना विचारपूस केली असता, त्यांना सौरभ उपाध्याय यांनी सायंकाळ असल्याने जिन्यावरील लाईट चालू करुन ते खाली उतरत असतांना त्यांना मगरे यांच्या घराचा कडीकोयंडा कापलेला दिसून आला. त्यानंतर ते खालच्या मजल्यावर आल्यानंतर त्यांना राजेश पाली व भगवान माळी यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तुटलेल दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

गोदरेजच्या कपाटात ठेवलेले २ लाख १७ हजारांचे दागिने लंपास
आपल्या घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याचे सांगितल्यानंतर रविंद्र मगरे यांनी लागलीच घरी जावून पाहणी केली. यावेळी त्यांना बेडरुममधील गोदरेजच्या कपाटाचे लॉक तुटलेले होते आणि त्यातून २ लाख १७ हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघड झाले.

समोरासमोरील घरांमध्ये चोरट्यांनी हातसफाई करीत लांबवला ऐवज
चोरट्यांनी मगरे यांच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांच्या खालच्या मजल्यावर राहणारे राजेश पाली यांच्या बंद असलेल्या घराला लक्ष्य केले. त्यांच्या घरात लाकडी कपाटातील पेटीत ठेवलेले ३५ हजारांचे मंगळसूत्र, १ हजार पाचशे रुपयांचे चांदीचे शिक्के आणि १ हजार २०० रुपयांची तीन भाराची चांदीचे पायल असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज तर त्यांच्या समोर राहणारे भगवान बाबुराव माळी यांच्या घरातून चोरट्यांनी २८ हजार रुपयांची सोन्याची चीप आणि दहा हजारांची अडीच भार चांदीच्या साकळ्या अशा एकूण ३८ हजारांचा ऐवज चोरुन नेला.

महामार्गावरील फुटेजची तपासणी
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अपार्टमेंटच्या आजूबाजूच्या परिसरासह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातुन मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात श्री खाटू श्यामजी संकीर्तन तथा फागण महोत्सव उत्साहात

March 17, 2025

जळगाव : अपार्टमेंटमधील बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई !

January 15, 2025

भुसावळात विजेचा शॉक लागल्याने वृध्द महिलेचा मृत्यू ; ईईएसएल कंपनीच्या एकाविरुद्ध गुन्हा !

September 8, 2023

जळगावात धाडसी घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह ATM कार्ड लांबविले

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group