जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क कोल्ड फायर नामक फटाक्याचा रिमोटच्या सहाय्याने स्फोटकरून मालवाहू वाहन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडकीस आला होता.
पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत एकाला अटक केली आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पुलाच्या जवळ घटना घडली होती. सुदैवाने घटना वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळत वाहनातील फक्त सामान आगीत जळाले होते.
भुसावळ येथील धीरज जितेंद्र राणे या तरुणाचा सलीम खान यांच्यासोबत ट्रान्सपोर्ट व्यवसायातून वाद होता. मतीन खान यांचे नुकसान व्हावे, यासाठी धीरजने त्यांच्या वाहनात डेली सर्विसच्या माध्यमातून दोन बॉक्स ठेवले. त्या बॉक्समध्ये कापूस, फटाके, सुतळी बॉम्ब, पेट्रोलने भरलेल्या प्लॅस्टीक बाटल्या आणि शोबाजीचे फटाके उडविण्यासाठी लागणारे इग्नेटर असे जोडून ठेवले.
फटाके फुटल्यावर पेट्रोल भडका घेईल आणि त्यानंतर संपूर्ण वाहन जाळून खाक करता यासाठी पेट्रोलच्या बाटल्या ठेवल्या होत्या. सकाळी धीरजने आपली दुचाकी मालवाहू आयशरच्या बाजूने नेत रिमोटच्या सहाय्याने फटाक्यांचा स्फोट केला. परंतु सुदैवाने वेळीच घटना लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलिसांनी धीरज राणे नामक तरुणाला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून त्याने हे कृत्य केले असून त्याला या प्रकारात कुणी-कुणी मदत केली?. तसेच या गुन्ह्यात इतर कुणाचा सहभाग आहे, त्यांचा देखील शोध घेतला जात आहे.
-संदीप गावीत
विभागीय पोलीस अधिकारी, जळगाव