जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयातील कोट्यवधी रूपयांच्या व्हॉटेलेटर (oxygen ventilator) खरेदी प्रकरणाच्या कथित गैरव्यवहाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे (Dinesh bhole) यांनी पोलिसांकडे १९ डिसेंबर रोजी ऑनलाईन तक्रार (Online Fir) दाखल केली आहे. परंतू गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे व्हेंटिलेटर खरेदीत गैरव्यवहार करून फसवणूक करणारे अधिकारी, कर्मचारी व पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासह व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द झाल्याची संपूर्ण कागदपत्रे, पैसे दिले व ते परत मिळवल्याबाबत बँकचे स्टेटमेंट, CGST व SGST भरल्या बाबतची संपूर्ण कागदपत्रे मिळावी, अशी मागणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून कोण धडपडतंय?
जिल्हा रुग्णालयातील कोट्यवधी रूपयांच्या व्हॉटेलेटर खरेदी प्रकरणाच्या कथित गैरव्यवहाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी उजेडात आणल्यापासून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोणी तर धडपडत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी दोषी अधिकाऱ्यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिशाभूल करणारी माहिती दिलीय. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. यांनतर या प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची चौकशी झाली असून त्यात अनियमितता झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडे पाठविला आहे. त्यानुसार अनियमितता झाल्याचे लक्षात येताच ही व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आ.विलास पोतनीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली. जर अहवालात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर मग पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल फार्मावर प्रशासनाला कोणतीच कारवाई का झाली नाही?. थोडक्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून कुणाची तरी धडपड सुरु असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, यात राजकीय हस्तक्षेपाची देखील चर्चा आहे. त्यामुळेच कागदोपत्री पुरावा असतांना अगदी खुद्द आरोग्यमंत्र्यांनी अनियमितता झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडे पाठविला असल्याचे सांगूनही भोळेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होत नसल्याचेही बोलेले जात आहे.
संपूर्ण कागदपत्रे द्या : तक्रारदार भोळे
व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द झाल्याची संपूर्ण कागदपत्रे, पैसे दिले व ते परत मिळवल्याबाबत बँकचे स्टेटमेंट, CGST व SGST भरल्या बाबतची संपूर्ण कागदपत्रे मिळावी, अशी मागणी दिनेश कडू भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दिनेश कडू भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली निवेदनात म्हटले आहे की, आपल्याकडे व्हेंटिलेटर खरेदीच्या ब्रँड व मॉडेल मध्ये तफावत असल्याबाबत तक्रार केलेली होती. आपण त्यावर चौकशी न करता आपण आपल्या पद्धतीने सदर व्हेंटिलेटरच्या स्पेसिफिकेशनची चौकशी केली व त्या अनुषंगाने खरेदी प्रक्रिया रद्द केली आहे. तरी व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द केल्या बाबतची संपूर्ण कागदपत्रे पंचनामा वगैरेसह मिळावी, असे भोळे यांनी म्हटले आहे.
CGST व SGST चा भुर्दंड कोणी सहन केला?.
व्हेंटिलेटर पुरवठादारास आपण अदा केलेल्या रक्कमेची (transfer) बँक स्टेटमेंट व खरेदी प्रक्रिया रद्द झाल्याने पुरवठादाराने शासनाकडे परत केलेल्या निधीचे बँक स्टेटमेंट व बँक प्रणालीची संपूर्ण माहिती मिळावी. सदर व्हेंटिलेटर पुरवठादार लक्षमी सर्जिकल यांनी राज्य व केंद्र शासनाकडे भरलेला (CGST व SGST) रक्कम रु. १७,६९,२४४ चा भरणा पावतीसह संपूर्ण कागदपत्रे मिळावी. तसेच खरेदी प्रक्रिया रद्द झाल्या कारणाने शासनाकडे भरलेल्या या निधीवर CGST व SGST चा भुर्दंड कोणी सहन केला?. शासनाने की संबंधित पुरवठादाराने?, याबाबतही संपूर्ण माहिती मिळावी. तसेच संदर्भ २ नुसार आपणास दोष सिद्ध आढळून आलेले व्हेंटिलेटर आपल्या समक्ष व पोलीस प्रशासनामार्फत सीलबंद करण्यात यावे, असे निवेदन देऊनही आपण संबंधित पुरवठादारास सदर वेंटिलेटर परत केले. त्याबाबत शासनाच्या नियम व अटी आहे. तसेच व्हेंटिलेटर परत करावी. याबाबत आपल्याकडील आदेशाच्या प्रती मिळाव्यात.
दोषी अधिकारी, कर्मचारी व पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा : भोळे
शासनाच्या ई-टेंडर कार्य प्रणालीद्वारे २९ मे २१ रोजीच्या करार पत्रामध्ये Max adult and paediatric ICU ventilator Max brand चे proton Plus मॉडेल खरेदी करण्याचे नमूद होते. त्यात मोठ्या व्यक्तींसाठी १५ अधिक लहान मुलांसाठी 30 व्हेंटिलेटरची किंमत अंदाजे किंमत कींमत 3 कोटी 71 लाख 54 हजार 130 रुपये एवढी आहे. त्यात संबंधित पुरवठादार कंपनी यांना २८/०६/२१ पर्यंत पुरवठा करण्याचे नमूद आहे. संबंधित पुरवठादार कंपनी यांनी डॉ. नागोजी चव्हाण व भांडारपाल मिलिंद काळे यांनी संगनमत करून DPDC अंतर्गत निधीचा अपहार व गैरवापर करण्याच्या उद्देशाने निविदेत नमूद ब्रँडच्या नावाऐवजी पुरवठादार यांच्याकडून Shreeyas- या ब्रँडचे १५ व्हेंटिलेटर दिनांक २६ जून २१ रोजी भांडारपाल मिलिंद काळे यांनी स्वतः स्वीकारल्याचे डिलिव्हरी चलन वर सही सह नमूद आहे. तसेच दुसरे १५ व्हेंटिलेटर दिनांक १९ जुलै २१ रोजी स्वीकारल्याचे नमूद आहे. त्यात मिलिंद काळे यांनी डॉ. नागोजी चव्हाण यांच्यासह निविदा प्रक्रिया पार पाडलेली आहे.
…हा तर रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार
तरी मिलिंद काळे यांना माहिती असून सदर व्हेंटिलेटर हे Max brand चे proton-plus खरेदी निवेदित नमूद आहे. तरी संबंधितांनी फसवणुकीच्या दृष्टिकोनातून Shreeyas-900 कंपनीचे मॉडेल नंबर नमूद असलेले डिलिव्हरी चलनसह लेटर मशीन ताब्यात घेतलेले आहे. तरीही संबंधित व्यक्तींना माहिती असून कमी किमतींची व कुठलेही medical greading नसलेले मशीन खरेदी करणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. संबंधितांनी पुरविलेल्या माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अपूर्ण कागदपत्रांची वेळोवेळी मागणी केली असता संबंधितांनी देण्यास टाळाटाळ केली असल्याने भंडारपाल यांना व्हेंटिलेटरची पडताळणीची विनंती केली असता दिनांक २ ऑगस्ट २१ रोजी लक्षमी सर्जिकलचे विक्री प्रतिनिधी घनश्याम पाटील, सामान्य रुग्णालयाचे भांडारपाल मिलिंद काळे, व कनिष्ठ लिपिक जितेंद्र परदेशी यांच्यासमक्ष कंपनीचे पुणे येथील इंजिनिअरसह पडताळणी केली असता सर्व brand name, model no. व त्यांनी फसवणुकीच्या दृष्टिकोनातून दिलेल्या डिलिव्हरी चलन व प्रत्यक्ष व्हेंटिलेटरचे मॉडेल नंबर यात सुद्धा तफावत आढळून आलेली आहे.
निविदेतील संपूर्ण प्रक्रियेत नमूद माहितीत तफावत असल्याचे कबूल
या घडलेल्या प्रकाराबाबत संबंधितांनी त्याच ठिकाणी brand name, model no. चलन पावती तील मॉडेल नंबर तसेच निविदेतील संपूर्ण प्रक्रिया यात नमूद माहितीत तफावत असल्याचे कबूल करून तथा लेखी मला पुरवण्यात आले आहे. तरी या निविदा प्रक्रियेत नेहमी नेहमी एकाच व्यक्तीला किंवा ठराविक व्यक्तीलाच समाविष्ट केले जाते. या प्रकाराबाबत ही चौकशी होणे गरजेचे आहे. तरी माझी आपणास या तक्रार तथा निवेदनाद्वारे विनंती आहे की व्हेंटिलेटर च्या गैरव्यवहार मध्ये समाविष्ट असलेले पुरवठादार लक्ष्मी सर्जिकल यांना काळ्या यादीत टाकावे व त्यांनी मागील काळात असाच फसवणुकीचा प्रयत्न केला काय याबाबत चौकशी करावी. तसेच संबंधित अधिकारी डॉक्टर नागोजी चव्हाण व भांडारपाल मिलिंद काळे यांनी संबंधितांशी संगनमत करून कटकारस्थान रचून निधीला अपहार व गैरवापर तसेच संबंधितांना पदाचा गैरवापर करून आर्थिक फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपणास संबंधितांची चौकशी करून कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी ही विनंती, असेही भोळे यांनी म्हटले आहे.