जळगाव प्रतिनिधी । एकाकडून घेणे असलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ करत तिच्या पतीला मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरुवार २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता निमखेडी शिवारात असलेले सुकृती अपार्टमेंट येथे घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आशा दिनेश पाटील वय-३७, रा.शास्त्रीनगर, रामानंदनगर या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांनी सुरेश विक्रम पाटील रा. श्रीराम समर्थ कॉलनी जळगाव याच्याकडे घेणे असलेले ५ लाख रूपये घेण्यासाठी आशा पाटील ह्या पती दिनेश पाटील यांच्यासोबत गुरूवार २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता निमखेडी शिवारातील सुकृती अपार्टमेंट येथे गेले होते. त्यावेळी सुरेश पाटील यांच्याकडे पैसे मागितले याचा राग घेऊन सुरेश पाटील याने महिलेचे पती दिनेश पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच आशा पाटील यांना अश्लिल शिवीगाळ करत धमकी दिली. दरम्यान या घटनेप्रकरणी महिलेने तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा सुरेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करत आहे.