जामनेर (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाल्याच्या तक्रार प्रकरणी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने तक्रारदार ॲड. विजय पाटील यांच्यासह ठेकेदार आर.के.शर्मा यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या ताब्यातील बीओटी तत्वावर विकसित करण्यात करण्याच्या अनुषंगाने केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे आज आर.के.शर्मा(बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर) व अँड. विजय भास्करराव पाटील यांना पत्र प्राप्त झाले असून त्यांना २७/५/२०२१ रोजी दोघांना आपले म्हणणे चौकशी समिती समोर मांडण्यासाठी सकाळी ११ वाजता समक्ष उपस्थित राहण्याचे आज प्राप्त झालेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
वाचा चौकशी समितीने दिलेले पत्र जसच तसं
जा. क्र.विआशा/जिपजचौ/तपासणी/१५८४२/२०२१
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड
दिनांक :- २१/५/२०२१, जा. क्र. :- ७१६६
प्रति
श्री.आर.के.शर्मा,
बिल्डर अँण्ड कॉन्ट्रॅक्टर,
जळगाव
विषय :- जळगाव जिल्हयातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर विकसित
करण्याच्या अनुषंगाने कामाची सखोल चौकशीबाबत.
संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक. संकुल- २०१०/प्र. क्र.११२/पंरा-७, दिनांक : २५
जुलै, २०२१.
२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२१/प्र. क्र.६२/ बांधकाम-४, दिनांक : ०६ एप्रिल,
२०२१.
वरील संदर्भिय विषयान्वये आपणांस अवगत करण्यात येते की, सदर चौकशी प्रकरणी शासन आदेशानुसार आपल्या फर्मला सदर काम करण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते.
तक्रारीत नमूद मुद्यांच्या अनुषंगाने सदर प्रकरणी आपला जबाब नोंदवणे आवश्यक असल्याने आपण चौकशी समिती समोर दिनांक : २७/०५/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आपला जबाब नोंदविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे समक्ष उपस्थित रहावे.
जा. क्र.विआशा/जिपजचौ/तपासणी/१५८४२/२०२१
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड
दिनांक :- २१/५/२०२१, जा. क्र. :- ७१६६
प्रति,
अँड. विजय भास्करराव पाटील,
रा. ७१,दीक्षितवाडी, जिल्हापेठ,
जळगाव, जि. जळगाव
विषय :- जळगाव जिल्हयातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर
विकसित करण्याच्या अनुषंगाने कामाची सखोल चौकशीबाबत.
संदर्भ :- महाराष्ट्र्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२१/प्र.क्र.६२/बांधकाम-४, दिनांक : ६ एप्रिल,
२०२१
वरील संदर्भिय विषयान्वये आपणांस अवगत करण्यात येते की, सदर चौकशी प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे चौकशी समिती समोर मांडणेकामी आपण दिनांक : २७/०५/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे समक्ष उपस्थित रहावे.
(राजन पाटील) (चंद्रकांत वानखेडे) (मनिष सांगळे)
सहाय्यक आयुक्त (चौकशी) सहाय्यक संचालक (विकास) सहाय्यक आयुक्त (तपासणी)
तथा चौकशी समिती सदस्य तथा चौकशी समिती सदस्य सचिव तथा चौकशी समिती अध्यक्ष
नाशिक विभाग, नाशिक नाशिक विभाग, नाशिक नाशिक विभाग, नाशिक,