TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र केंद्र शासनाच्या निकषांमुळे त्यात अडथळे येत आहेत. ऊर्जा विभागाकडून सर्व नियमित व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना फ्रंण्टलाईन वर्कर्सप्रमाणेच लाभ देण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून वीज संघटनांच्या संयुक्त कृती समितीने काम बंद आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

दरम्यान वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांचे लसीकरण जलदगतीने व्हावे यासाठी लसींचे ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रस्ताव असून त्याबाबत विविध बाबी तपासून लवकरच निर्णय घेतला जाईल असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यतेसह इतर काही मागण्यांसाठी वीज अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आजपासून (दि.२४) काम बंद आंदोलन सुरु केले. त्याबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (महावितरण), संजय खंदारे (महानिर्मिती) यांच्यासह संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी मोहन शर्मा, संजय ठाकूर, कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आर.टी. देवकांत, सय्यद जहिरोद्दीन, दत्तात्रय गुट्टे आदीनी आपली मते मांडली.

ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी सांगितले की, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून व स्वतः संपर्क साधत आहे. त्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणेच वैद्यकीय व आर्थिक संरक्षणाचे निर्णय ऊर्जा विभागाकडून घेतले जात आहेत. यामध्ये कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य व २० लाख रुपयांचा विमा अशी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. सर्व वीज कर्मचाऱ्यांचे जलदगतीने लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरु असून आतापर्यंत ५६ टक्के वीज कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सोबतच वीज कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय विम्यासाठी नेमण्यात आलेली मेडीअसिस्ट ही टीपीए संस्था (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर) योग्य प्रक्रियेद्वारे निवडण्यात आली असून शासनाच्या इतर विभागांसाठी ही संस्था टीपीए म्हणून काम पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

संचारबंदीच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजबिलांची सक्ती करण्यात आलेली नाही असे ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रादुर्भावात तसेच ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये युद्धपातळीवर कार्यरत असलेल्या सर्व वीज अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. वीज कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता देण्याची ऊर्जा खात्याचा पालक म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यासाठी मी अत्यंत सकारात्मक व आवश्यक निर्णय घेतले जात आहेत. त्याबाबत कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी संवाद साधलेला आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी सुरु आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने सुरु केलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

हृदयविकाराच्या झटक्याने हाजी गफ्फार मलिक यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामठी-बेटावद मार्गे फरदापुर रस्त्याचे काम निकृष्ट ; नागरिक संतप्त !

January 1, 2023

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

June 29, 2025

‘त्या’ तरुणाचे उपोषण मागे ; पो.नि. शेळके यांची मध्यस्थी !

February 21, 2022

उडान फाऊंडेशनने दिव्यांगांसाठी राबविले आठवडाभर उपक्रम, बक्षिसांची लयलूट

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group