धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महापौरपदी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाल्याबद्दल धरणगाव पंचायत समितीच्या प्रांगणात शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून प्रचंड जल्लोषात आनंद साजरा केला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती मुकुंद भाऊ नन्नावरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ, पं.स. सदस्य आसाराम कोळी, राजु मोरे,आनंद मोरे,राजु वाणी (माजी सरपंच चावलखेडा),प्रमोद माळी,अनिल मरसाळे,गुलाब मरसाळे,अनिल सुफडू गायकवाड (माजी सरपंच चावलखेडा), राहुल रोकडे यांच्यासह यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.