धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) किनगाव येथे (दि.९ ऑक्टोबर) रोजी जिवा महाले जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून साजरी करणयात आली.
यावेळी ” होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” असा गजर करण्यात आला. तद्नंतर कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी स्वतःच्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता कामकाज करणाऱ्या नाभिक कुळाचे कोरोना योद्धा मनीषा अटवाडे वढोदे प्र. यावल, मनीषा बाणाईत (सोनवणे) पाडळसे, सुमन अंबिकार हिंगोणे, रेखा बाणाइत सांगवी, हिराबाई सुर्यवंशी मालोद यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे यावल तालुका आखिल भारतीय जीवा सेना तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष मनोज सूर्यवंशी किनगाव, तालुका उपाध्यक्ष रवींद्र वसाने न्हावी यांची व पूर्ण तालुका कार्यकारणीची सर्वानुमते निवड नियुक्त पत्र देण्यात आले.
तेव्हा जीवा महाले बहुउद्देशिय संस्था यावल यांची उपशाखा म्हणून किनगाव येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी किनगाव शहराध्यक्ष सुरेश खंबायत व उपाध्यक्ष सुनील लिंबायत पूर्ण कार्यकारिणीस नियुक्त पत्र देण्यात आले.
यावेळस उपस्थित अखिल भारतीय जीवा महाले प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुधीर महाले, जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ वाघ, किशोर श्रीखंडे, जिल्हा प्रवक्ता व जिल्हा संपर्क प्रमुख सुनील श्रीखंडे यावल तालुक्याचे सर्वांचे लाडके नेते अनिल चौधरी अध्यक्ष जीवा महाले बहूद्देशिय संस्था यावल व जिल्हा कार्याध्यक्ष व कारक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश निंबायती किनगाव यांनी केले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे किनगाव व यावल परिसरातील समस्त नाभिक समाज बांधव उपस्थित होते.